सोशल मीडियावर चर्चा रंगली; Bigg Boss Marathi 6 मधून प्राजक्ता शुक्रे बाहेर?

Bigg Boss Marathi 6 – Prajakta Shukre: Bigg Boss Marathi 6’ मध्ये प्रत्येक आठवड्याला एव्हिक्शनची उत्सुकता असते. वीकेंड आला की प्रेक्षकांना भाऊच्या धक्क्याची आणि कोण घराबाहेर जाणार याची प्रतीक्षा लागलेली असते. या आठवड्याचाही शेवट जवळ आला असून घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

घरातील गेम, नॉमिनेशन टास्क आणि प्रेक्षकांचे वोटिंग यावरून एव्हिक्शन ठरतो. या आठवड्यातील नॉमिनेशनमध्ये रेवा कौरासे, संकेत पाठक, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, अनुश्री माने आणि तन्वी कोलते यांची नावे समोर आली होती. मात्र संकेत पाठक या आठवड्याचा कॅप्टन असल्यामुळे तो सुरक्षित आहे.

दरम्यान, नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधून एक नाव बाहेर जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. अनेक प्रेक्षकांच्या मते, घरात फारसा गेम न दिसलेला एक सदस्य या आठवड्यात बाहेर पडू शकतो. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुख यांनी या सदस्याला गेमबद्दल स्पष्ट शब्दांत सुनावलं होतं.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, प्राजक्ता शुक्रे नवव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

प्राजक्ताचा गेम सुरुवातीपासून फारसा चर्चेत नव्हता. ती क्वचितच वादात दिसायची आणि घरातील भांडणांपासून दूर राहायची. यामुळेच तन्वी कोलतेने तिला ‘आयुर्वेदिक’ असं टोपणनाव दिलं होतं. सोशल मीडियावरही तिच्या शांत स्वभावावरून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

करण सोनावणे घरात असताना प्राजक्ता त्याच्यासोबत गप्पा मारताना दिसायची. दोघे कधी कधी इतर स्पर्धकांबद्दल बोलतानाही दिसले. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी अनेकदा प्राजक्ताला तिचा गेम सुधारण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिच्या खेळात फारसा बदल दिसला नाही.

आता सोशल मीडियावर प्राजक्ता घराबाहेर गेल्याच्या चर्चांवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी “बरं झालं गेली” अशा कमेंट्स करत आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे या एव्हिक्शनची चर्चा सध्या जोरात रंगली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page