टोळीच्या विरोधात रुचिता, नॉमिनेशन टास्कमध्ये घरात खळबळ

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये सातव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कने घरातील वातावरण तापलं आहे. या आठवड्यात काही सदस्य आधीच सुरक्षित झाले आहेत, तर उर्वरित सदस्यांमध्ये तणाव वाढला आहे.

सध्या घराची कॅप्टन असलेली तन्वी कोलते नॉमिनेशनपासून आधीच सेफ आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांना ‘Power Key’ मिळाली होती. मात्र, प्राजक्ताची चावी प्रभूने चोरल्यामुळे सगळं समीकरण बदललं.

सोमवारी बिग बॉसने दोघींना त्यांची ‘Power Key’ महाद्वारात जमा करण्यास सांगितलं. अनुश्रीने तिची चावी परत केली. पण प्राजक्ताची चावी तिच्याकडे नव्हती. त्यामुळे तिच्या ऐवजी प्रभूने ती जमा केली. यानंतर बिग बॉसने घोषणा करत प्रभू आणि अनुश्रीला सेफ केलं.

यामुळे आता तन्वी, अनुश्री आणि प्रभू हे ३ सदस्य सुरक्षित झाले आहेत.

दरम्यान, उर्वरित सदस्यांना नॉमिनेशन टास्क खेळावा लागणार आहे. या टास्कमध्ये प्रत्येकाच्या गळ्यात दुसऱ्या सदस्याचा फोटो आहे. त्यावरून नॉमिनेशनचं समीकरण ठरणार आहे.

फोटोचं समीकरण असं आहे –
सागर – दिपाली
राकेश – रोशन
रुचिता – राकेश
दिपाली – रुचिता
विशाल – सागर
प्राजक्ता – विशाल
राखी – प्राजक्ता
रोशन – राखी

या टास्कमध्ये रुचिता चर्चेत आली आहे. तिच्या गळ्यात राकेशचा फोटो आहे. पण ती त्याला नॉमिनेट करत नाही. कारण दिपालीच्या गळ्यात रुचिताचा फोटो आहे. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी ती सावध पाऊल टाकताना दिसते.

विशालने यावर तिला जाब विचारला. तसेच प्राजक्ता, सागर आणि इतरांनीही “तू शब्द मोडतेयस” असं म्हणत टोमणे मारले. मात्र रुचिता स्पष्ट बोलली. “मी स्वतःसाठी खेळणार”, असं तिने ठाम सांगितलं. तिला आता टोळी किंवा ग्रुपचा फरक पडत नसल्याचंही ती म्हणाली.

नॉमिनेशन टास्कमुळे घरात नवे वाद निर्माण झाले आहेत. आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोणाच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page