BBM 6: घरात नवा प्रयोग, एका खोलीत लपली मोठी ताकद

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6’मध्ये आता एक नवा आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरात लवकरच ‘उल्टा-पुल्टा रूम’ उघडणार असून, ही खोली यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच दाखवली जात आहे.

या सिझनची थीम आहे ८०० खिडक्या, ९०० दारे. म्हणजे कोणतं दार कधी उघडेल, याचा अंदाज कुणालाच येत नाही. अशाच एका खास दारामागे ही ‘उल्टा-पुल्टा’ खोली आहे. या खोलीत सगळ्या गोष्टी उलट्या दिसतात आणि याचा थेट परिणाम स्पर्धेवर होणार आहे.

या रूममध्ये जाणारा स्पर्धक इतरांच्या गेमवर प्रभाव टाकू शकतो. कोणाचा खेळ मजबूत होईल आणि कोण अडचणीत येईल, हे या खोलीतील निर्णयांवर अवलंबून असणार आहे.

घराची कॅप्टन प्राजक्ता शुक्रे ही या खोलीत प्रवेश करणारी पहिली स्पर्धक आहे. बिग बॉसने तिला सांगितलं की, या रूममध्ये संपूर्ण गेम उलटा करण्याची ताकद आहे. यावरून या खोलीतून मिळणारी पॉवर किती मोठी आहे, याचा अंदाज येतो.

दरम्यान, पहिल्या आठवड्यात कोणालाही घरातून बाहेर काढण्यात आलेलं नाही. नॉमिनेट स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही खेळणार आहेत. त्यामुळे पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

बिग बॉस मराठी 6’ हा शो दररोज रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहता येतो.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page