Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात पुन्हा एकदा जोरदार वाद रंगला आहे. पहिल्या आठवड्यात कोणीही बाहेर गेलं नव्हतं, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आता अनुश्री आणि राकेश यांच्यातील वादामुळे घरात तणाव निर्माण झाला आहे.
नेहमी शांत दिसणारा राकेश बापट यावेळी चांगलाच भडकलेला दिसतो. अनुश्रीच्या वागण्यामुळे त्याचा पारा चढला आहे. बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका वाढला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राकेश “मला या घरात थांबायचं नाही” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर बिग बॉस थेट घराचं दार उघडतात. त्यामुळे आता कोण घराबाहेर जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
वादाच्या वेळी अनुश्री म्हणाली, “माझ्या बेडवरून मला कुणी हलवू शकत नाही.” यावर राकेश संतापला आणि म्हणाला, “हे बोलणं चुकीचं आहे. आयुष्यात मी 25 वर्ष काम केलं आहे. मला असं कुणी बोलू शकत नाही.”
व्हिडीओवर प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक अनुश्रीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींना राकेशचा संताप योग्य वाटत नाही. हा वाद निवळणार की राकेश खरंच घर सोडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘बिग बॉस मराठी 6’ हा शो दररोज रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहता येतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
