Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवर येणारा बिग बॉस मराठी 6 येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत प्रसारित होईल. ग्रँड प्रीमियरनंतर पुढील 100 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्यामुळे या वेळेत असलेल्या मालिकांवर परिणाम होणं अपेक्षितच होतं.
वाहिनीकडून काही दिवसांपूर्वी मालिकांच्या वेळा बदलण्याची घोषणा करण्यात आली होती. आता यामधून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बिग बॉस मराठी 6 साठी एका लोकप्रिय मालिकेचा प्रवास इथेच थांबणार आहे.
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ‘अशोक मा.मा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 10 जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. म्हणजेच सध्या केवळ दोन भागच बाकी आहेत. मालिकेचा शेवटचा प्रोमोही प्रसारित झाला असून, त्यात कथानक अंतिम टप्प्यावर पोहोचल्याचं दिसत आहे.
शेवटच्या भागात अशोक आणि निवेदिता यांचं लग्न दाखवण्यात येणार आहे. कोर्ट मॅरेजसाठी कुटुंबीय, मित्र आणि सोसायटीमधील मंडळी उपस्थित असतील. लग्नानंतर दोघांचा गृहप्रवेश आणि उखाणा असा आनंदी शेवट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका सकारात्मक वळणावर ही मालिका संपणार आहे.
फक्त ‘अशोक मा.मा’च नाही, तर इतर मालिकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ‘इंद्रायणी’ ही मालिका आता संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित होईल. ‘आई तुळजाभवानी’ 7 वाजता दाखवली जाईल. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका 7.30 वाजता, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे. हे सर्व बदल 12 जानेवारी 2026 पासून लागू होतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
