सूरज-संजनाच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर हॉस्पिटलमध्ये; काय घडलं?

Janhvi Killekar: मराठी मनोरंजन विश्व सध्या लग्नसमारंभांनी गजबजलेलं आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह २९ नोव्हेंबरला धुमधडाक्यात झाला. या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने. सूरजची करवली म्हणून ती प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होती.

मेहंदी, हळद आणि वरातीपर्यंत जान्हवी सतत दिसत होती. तिच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक लुकचं कौतुक केलं. परंतु लग्नानंतर मुंबईत परतताच तिची तब्येत अचानक बिघडली.

जान्हवीला अस्वस्थ वाटल्यानंतर तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. रुग्णालयातील फोटो शेअर करत तिने “Nazar Is Real” असं लिहिलं आणि चाहत्यांना माहिती दिली.

या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा पाठवल्या. चाहत्यांना आशा आहे की तिची तब्येत लवकर सुधारेल आणि ती पुन्हा शूटिंगला परत येईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page