Aditi Sarangdhar: मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात आलेला स्वामी समर्थांचा अनुभव तिनं पहिल्यांदाच सार्वजनिकपणे सांगितला. अनेक कलाकारांसारखाच अदितीचाही स्वामींवर विश्वास आहे.
अदितीनं सांगितलं की तिचं कॉलेज संपत आलं होतं आणि वादळवाटचं शूटिंग सुरू होतं. त्या काळात ती खूप तणावात होती. परीक्षेच्या दिवशी ट्रेनमध्ये एकटी बसून रडत होती. तिच्यासमोर बसलेल्या एका अनोळखी महिलेनं तिची विचारपूस केली. ती महिला स्वामीभक्त होती. तिनं अदितीला अंगारा आणि प्रसाद दिला. “त्या दिवशी माझं मन हलकं झालं आणि माझ्या परीक्षा व्यवस्थित गेल्या,” असं अदितीनं सांगितलं.
हीच महिला—भारती—नंतर अदितीची जवळची मैत्रीण झाली. भारतीनं एकदा तिला स्वामींची छोट्या आकाराची मूर्ती दिली. अदितीनं ती मूर्ती घरी आणून स्थापना केली आणि तिला जाणवलं की आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू सुधारत आहेत.
यानंतर एक प्रसंग तिला आजही आठवतो. अदिती म्हणाली, “आमच्या एका मावशींच्या हातून ती मूर्ती तुटली. मला खूप वाईट वाटलं.” तिनं भारतीला फोन केला आणि रडत रडत सगळं सांगितलं. भारती तत्काळ बँकेतून हाफ डे घेऊन आली, स्वामींची नवीन मूर्ती विकत घेतली, मठात अभिषेक करून ती मूर्ती दुपारी अदितीच्या घरी आणली.
“स्वामींना यायचंच होतं माझ्या घरी,” असे शब्द अदितीनं अगदी भावनेने सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, कठीण काळ आला की तिला आजही स्वामींची साथ जाणवते.
कामाबद्दल बोलायचं झालं तर अदितीने येऊ कशी तशी मी नांदायला आणि लक्ष्यसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा हा व्यक्तिशः अनुभव चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
