बॉक्स ऑफिसवर गाजलेला ‘दशावतार’ आता घरबसल्या पाहा; दिलीप प्रभावळकरांची जादू पुन्हा अनुभवूया

Dashavatar Movie on OTT ZEE5: कणचा निसर्ग, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम दाखवणारा ‘दशावतार’ हा सिनेमा २०२५ मधला सर्वाधिक गाजलेला मराठी चित्रपट ठरला होता. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि समीक्षकांचं कौतुक मिळवलं. आता हा चर्चेतला सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे.

‘दशावतार’ चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली. या सिनेमातील दशावताराचा खेळ आणि बाबुली मेस्त्री या पात्राने लोकांची मने जिंकली. वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली.

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. त्यांच्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते मराठी सिनेमातील खरे अभिनयसाधक आहेत.

‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टीनेदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. फक्त पाच कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल २८ कोटींचा गल्ला जमवला आणि सुपरहिट ठरला.

आता प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. ‘दशावतार’ १४ नोव्हेंबरपासून झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झी-5 ने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “एक ८० वर्षांचा कलाकार ज्याच्या आयुष्याच्या रंगमंचावर उभा राहिला दशावतार. पाहायला विसरू नका हा भव्य मराठी सिनेमा.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page