Trisha Thosar: नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांसारख्या कलाकारांनी पुरस्कार जिंकला. तर साऊथचा सुपरस्टार मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्यात बालकलाकारांनीही विशेष लक्ष वेधलं. त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, कबीर खंदारे आणि सुकृती वेणी बंद्रेड्डी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यापैकी ‘नाळ 2’ चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणारी त्रिशा ठोसर जेव्हा मंचावर आली, तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला. अवघ्या ६ व्या वर्षी तिने हा मानाचा पुरस्कार पटकावला.
पुरस्कारानंतर त्रिशाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. “हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान आहे. आईबाबा आणि आजीआजोबा आनंदाने रडत होते. गेल्या ७० वर्षांत सर्वात लहान वयात हा पुरस्कार मिळवणारी मी पहिली बालकलाकार ठरले,” असे ती म्हणाली.
त्रिशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे विशेष आभार मानले. तसेच कुटुंब, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “तुमच्या साथीनं मी इथे आलेय. पुढेही जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असे ती म्हणाली.
त्रिशाने याआधी महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातही भूमिका केली आहे. तिच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण घडला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
