कर्नाटकमधील चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतीवर मोठा निर्णय घेतला आहे. आता विकेंडला सिनेमा पाहायला जाताना 500 किंवा 700 रुपये खर्च करावे लागणार नाहीत. कोणत्याही थिएटरमध्ये एक तिकीट जास्तीत जास्त 200 रुपयांत मिळणार आहे.
शुक्रवारी कर्नाटक सरकारने कर्नाटक सिनेमा (नियंत्रण) नियम, 2014 मध्ये दुरुस्ती करून अधिसूचना जाहीर केली. त्यानुसार राज्यातील सर्व सिनेमा गृहांसाठी तिकीटाची कमाल किंमत 200 रुपये ठरवण्यात आली आहे. यामध्ये मल्टिप्लेक्सही सामील आहेत. मात्र ही रक्कम कराशिवाय असेल.
यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे. 75 किंवा त्यापेक्षा कमी आसन क्षमता असलेली, प्रीमियम सुविधा देणारी मल्टी-स्क्रीन थिएटरं 200 रुपयांपेक्षा जास्त दर आकारू शकतात. पण बाकी सर्व ठिकाणी तिकीटासाठी केवळ 200 रुपयेच मोजावे लागतील.
या निर्णयाची प्रक्रिया जुलै महिन्यातच सुरू झाली होती. तेव्हा सरकारने नियम दुरुस्तीचा मसुदा तयार करून हितधारकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर आलेल्या आक्षेप आणि सूचनांचा विचार करून सरकारने अंतिम अधिसूचना जारी केली.
हे नवे नियम कर्नाटक सिनेमा (नियमन) (दुरुस्ती) नियम, 2025 राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून लागू होतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
