गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता बने हिने पती अभिनेता शुभंकर एकबोटेसोबत कोकण सफर केली. लग्नानंतर प्रत्येक सण मोठ्या थाटात साजरा करणाऱ्या या जोडीने यंदाच्या गणपतीत पुण्यातील घरी बाप्पा आणल्यानंतर थेट अमृताच्या गावी – रत्नागिरीतील निरुळ येथे प्रस्थान केलं.
अमृताने या खास प्रवासाचा मिनी व्लॉग सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना कोकणाची सफर दाखवली. व्लॉगमध्ये बस स्टँडवर मिळालेली मिसळ, पावसात न्हालेलं निरुळ गाव, समुद्राचा नजारा, आणि जावयाचा मानपान या सगळ्या क्षणांना तिने टिपलं.
“एक हार्डकोअर पुणेकर ते मुंबईचा जावई… पण कोकणचा जावई कसा असतो, हे शुभंकरला दाखवल्याशिवाय राहायचं नव्हतं,” असं अमृताने सांगितलं. तिने पुढे जोडून म्हटलं, “गावच्या रस्त्यांवरून जाताना वाटलं – जिकडे नजर जाईल तिकडे स्वर्गच दिसतो आहे.”
शुभंकरनेही या कोकण प्रवासात घरगुती सणांची धामधूम आणि जावयाच्या मानपानाचा अनुभव घेतला. याबाबत अमृताने सांगितलं की, गौरींच्या आगमनाचा आनंद शुभंकरने यावेळी प्रथमच प्रत्यक्ष अनुभवला.
या व्लॉगला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी कोकणच्या सौंदर्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृताने पुढील भागात अजूनही काही कोकण सफरीचे क्षण शेअर करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
