मराठी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता विवेक सांगळेने मुंबईच्या लालबाग भागात स्वतःचं घर घेतलं आहे. हे ठिकाण त्याच्यासाठी खास आहे, कारण याच परिसरात त्याचे वडील दिग्विजय टेक्सटाईल मिलमध्ये काम करत होते. आज त्या मिलच्या शेजारीच त्याचं घर उभं आहे.
मुंबईत, विशेषतः लालबागसारख्या ठिकाणी, घर घेणं अनेकांसाठी फक्त स्वप्न असतं. इथे घरांच्या किमती कोटींच्या घरात जातात. तरीही विवेकने ही झेप घेतली आणि त्याला यामध्ये मोठी मदत केली अभिनेत्री तन्वी मुंडलेने. तन्वी आणि विवेक यांनी ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत एकत्र काम केलं होतं आणि ते दोघं खऱ्या आयुष्यातही जवळचे मित्र आहेत.
विवेक सांगतो, “अभ्युदयनगरमध्ये माझं बालपण गेलं. इथेच मोठा झालो आणि कायम वाटायचं की स्वतःचं घर असावं. पण खास इच्छा होती की वडिलांनी जिथे काम केलं त्या ठिकाणीच घर असावं. 2000 साली मिल बंद झाली, पण तिथेच घर घेऊन त्यांना तो व्ह्यू दाखवायचा होता. आज ते स्वप्न पूर्ण झालं.”
नवीन घर त्याच्या जुन्या घरापासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे. हा क्षण त्याच्यासाठी भावनिक आणि अभिमानास्पद दोन्ही आहे.
सध्या विवेक ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत ज्ञानदा रामतीर्थकर, मृणाल दुसानिस आणि विजय आंदळकरही प्रमुख भूमिकेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
