संगीत, स्वप्नं आणि जिद्दीचा संगम असलेला ‘झिंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची रिलीज डेट ठरली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ही कथा आहे गावातील उनाड पण मनाने सच्च्या किसनाची. वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न – तमाशाचा फड उभारणं – पूर्ण करण्यासाठी तो झटतो. गावकऱ्यांचा अविश्वास, आजोबांचा विरोध आणि पाटलांचं राजकारण यांना सामोरं जात किसना रंगमंचावर आपली कला दाखवतो का, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात किसनाची भूमिका कोण करतोय, हे मात्र अद्याप गुप्त ठेवण्यात आलं आहे. इतर कलाकारांची नावं देखील उघड करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे रहस्य आणखी गडद झालं आहे.
निर्माते दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन अमित वाल्मिक कोळी यांचं आहे. प्रताप जोशी यांनी कॅमेऱ्यात प्रत्येक क्षण टिपला आहे. पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत आणि आशिष पाटील यांचं नृत्यदिग्दर्शन ‘झिंग’ला आणखी रंगतदार बनवणार आहे.
‘झिंग’ 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. किसना गावाच्या मनात कलेचं आणि जिद्दीचं बीज पेरतो का, की हे स्वप्न अपूर्ण राहतं, याचा उलगडा मोठ्या पडद्यावर होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
