गनफायर होताच कानठळ्या बसल्या! स्वराज नागरगोजेचा ‘तारिणी’ मालिकेतील ॲक्शन अनुभव चर्चेत

Tarini Serial: ‘तारिणी’ या नव्या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदार नावाच्या अंडरकव्हर पोलिसाची भूमिका साकारतो. केदारचं ध्येय समाजातील वाढणारी गुन्हेगारी कमी करणं आणि आपल्या हरवलेल्या बाबांचा शोध घेणं आहे.

स्वराजने या भूमिकेच्या शूटिंगदरम्यानचा पहिला ॲक्शन अनुभव सांगितला. “मी आयुष्यात पहिल्यांदाच ॲक्शन सीन केला आणि गनफायर केली. मला कल्पनाच नव्हती की गनफायरचा आवाज इतका मोठा असतो. मी आणि शिवानीने जेव्हा शूटदरम्यान गनफायर केली, तेव्हा आम्ही दोघं 10-15 सेकंदांसाठी सुन्न झालो. कानठळ्या बसल्या आणि आम्ही हसू लागलो,” तो म्हणाला.

त्याने पुढे सांगितले, “पहिला प्रोमो शूट हा खूप वेगळा अनुभव होता. ॲक्शन आणि गनफायर करताना खूप मजा आली. मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे यांनी मला ऑडिशनसाठी फोन केला होता. पण कामामुळे दोनदा ऑडिशनला जाता आलं नाही. शेवटी मी घरून व्हिडिओ बनवून ऑडिशन पाठवण्याची विनंती केली.”

पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असल्यामुळे स्वराजने फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. “जेव्हा सिलेक्शनचा कॉल आला, तेव्हा लूक टेस्ट सुरू होती. ऑडिशनची तयारी करत असतानाच झी मराठीच्या शर्मिष्ठा मॅडमनी सांगितलं की मी भूमिकेसाठी निवडला गेलोय. लगेच आई-बाबांना आणि माझ्या जवळच्या मैत्रीणीला सांगितलं. माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत. त्यांनी आधीच सांगितलं होतं की तुझंच सिलेक्शन होणार.”

प्रोमोबद्दल बोलताना स्वराज म्हणाला, “गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रोमो प्रदर्शित झाला आणि 24 तासांत दहा लाख व्ह्यूज मिळाले. प्रेक्षकांच्या कमेंट्समधून त्यांचा उत्साह जाणवत होता. सेटवर शिवानीसोबत चांगली मैत्री झाली आहे. माझी भूमिका केदार एकटाच राहणारा, आई नसलेला आणि बाबांच्या शोधात असलेला तरुण आहे. त्याचं एकच ध्येय आहे—गुन्हेगारी कमी करणं. ही मालिका प्रेक्षकांना ॲक्शन आणि फॅमिली ड्रामाचं अनोखं मिश्रण देणार आहे.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page