स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ सध्या प्रेक्षकांना खूप गुंतवून ठेवतेय. मालिकेत राकेश आणि राजेश यांचं गुपित उलगडण्याचा प्रयत्न अर्णव करत आहे आणि पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पण याच दरम्यान मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी प्रेक्षकांना लवकरच दुसरी अभिनेत्री दिसणार आहे.
स्वाती चिटणीस यांच्या जागी आता वंदना पंडित यांची एन्ट्री होणार आहे. वंदना यांनी यापूर्वी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. त्यामुळे ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये त्यांना पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
याआधी या मालिकेत ईश्वरीच्या आत्येची भूमिका करणाऱ्या संजीवनी साठे यांनी शो सोडला होता. आता पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना थोडं खटकणार असलं तरी नवीन एन्ट्रीमुळे कथेत रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या मालिकेत शर्वरी जोग (ईश्वरी), अभिजीत आमकर (अर्णव) आणि आशुतोष गोखले (राकेश) या कलाकारांच्या भूमिका सध्या गाजत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
