Pooja Birari: अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी सध्या लग्नसराईची धामधूम आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकत आहे. अभिनेत्री पूजा बिरारी सोहमसोबत लग्न करणार असून दोन्ही कुटुंबांकडून लग्नाच्या तयारीला जोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी सोहमचं केळवण पार पडलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता पूजाचंही केळवण मोठ्या थाटात झालं. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या टीमने तिचं केळवण साजरं केलं आणि त्याचे व्हिडीओ नेटवर चर्चेत आहेत.
या कार्यक्रमात पूजाने घेतलेला खास उखाणा सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ती म्हणाली,
“घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजेच सोहम आता होणार माझे मिस्टर.”
उखाणा ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. पूजेला साडीची भेटदेखील देण्यात आली.
पूजा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मंजिरीची भूमिका करते, तर विशाल निकम रायाच्या भूमिकेत आहे. सोहमनेही निर्मिती क्षेत्रात चांगलं योगदान दिलं आहे. ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती त्याने केली असून ‘नवे लक्ष्य’मध्ये त्याने अभिनय केला आहे.
पूजा ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ यांसारख्या मालिकांमुळे प्रेक्षकांना परिचित आहे. ‘स्वाभिमान’मुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली आणि तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
काही महिन्यांपूर्वी ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनमध्ये सोहमला त्याला कशी मुलगी हवी? असं विचारलं असता त्याने उत्तर दिलं होतं – “आईला आवडली पाहिजे बस.” नंतर पूजा बिरारीचं नाव पुढे आलं आणि गणेशोत्सव तसेच दिवाळीत दोघांचे फोटो चर्चेत राहिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
