मराठी चित्रपटसृष्टीत आता सीक्वलचा ट्रेंड जोरात दिसतो आहे. गाजलेला ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रेक्षकांना अजूनही तितकाच आठवतो. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आणि त्यांच्या खोडकर किस्स्यांमुळे प्रेक्षक पोट धरून हसले होते. आता त्याचाच दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांसमोर येतो आहे.
नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे तिघेही त्यांच्या खास अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही धमाल करताना दिसणार आहे. याशिवाय रिंकू राजगुरूचा ताजातवाना लूक या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण ठरणार आहे.
दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, “पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. मात्र कलाकार, निर्माते, लेखक संदीप दंडवते आणि तांत्रिक टीम यांच्या मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना पूर्ण करू शकलो. हा एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजनपट असेल.”
निर्मात्या उषा काकडे यांनी सांगितलं की, हा प्रोजेक्ट त्यांच्या दृष्टीने खूप खास आहे. “पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या या फ्रँचायझीला पुढे नेणं हा आनंदाचा अनुभव होता. कलाकारांची भन्नाट केमिस्ट्रीच या सिनेमाची खरी ताकद आहे,” असं त्या म्हणाल्या.
निर्माते अमेय खोपकर यांनी सांगितलं की, “पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर प्रेक्षकांना कुरळे ब्रदर्सना पुन्हा भेटण्याची प्रचंड उत्सुकता होती. दुसऱ्या भागात हास्याचा डबल डोस मिळणार आहे.”
हा चित्रपट झी स्टुडिओज, उषा काकडे प्रॉडक्शन्स, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स आणि इतरांच्या सहकार्याने तयार होत आहे. कथा अंकुश चौधरी, पटकथा आणि संवाद संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत.
मुख्य भूमिकेत अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर दिसणार आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला हा धमाल चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी येणार असून, पुन्हा एकदा थिएटरमध्ये हास्याचा महापूर उसळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
