Laxmichya Pavlani – Isha Keskar: लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेबद्दल काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चा अखेर खरी ठरल्या. ‘कला’ची भूमिका करणारी ईशा केसकर आता मालिकेत दिसणार नाही. तिची अधिकृत एक्झिट झाली असून, कथेत नवी दिशा देण्यासाठी एका नव्या नायिकेची एंट्री दाखवली आहे. चॅनलने यासाठी खास प्रोमोही शेअर केला.
मागील एपिसोडमध्ये कलाला घराचं सत्य अद्वैतपर्यंत पोहोचवायचं असतं. ती चिठ्ठी लिहून त्याच्यापर्यंत कुठल्यातरी मार्गाने पोहोचवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच वेळी तिचा अपघात होतो. याच प्रसंगातून ‘सुकन्या’ ही नवी व्यक्तिरेखा कथेत येते. तिला हार्टचा त्रास असतानाही ती कलाला वाचवते. कलाला शुद्ध आल्यानंतर तिला आपलं प्राण वाचवणारी व्यक्ती कोण हे समजतं.
अद्वैतला अपघाताबद्दल कळताच तो रुग्णालयात पोहोचतो. कला त्याला पाहून आशा ठेवते की आता तो त्यांच्या घराबद्दलचं सत्य जाणून घेईल. पण त्याच क्षणी कला प्राण सोडते आणि इथेच कथेला नवीन वळण मिळतं.
नव्या प्रोमोमध्ये, कलाच्या मृत्युला सहा महिने उलटलेले दाखवले आहेत. आबा अद्वैतला मंदिरात बोलावतात, पण तो नकार देतो. त्याची मन:स्थिती अजूनही कलेभोवतीच अडकलेली दिसते. दुसरीकडे सुकन्या देवीसमोर प्रार्थना करताना सांगते की तिला नवीन जीवन देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे आभार मानायचे आहेत. ती मंदिरातून निघताना अद्वैतला धडकते आणि दोघं एकमेकांकडे पाहतात.
या क्षणी प्रेक्षकांना स्पष्ट होतं की सुकन्याला मिळालेलं नवं हृदय म्हणजे कलाचं असावं. त्यामुळे आता सुकन्याच्या मनात अद्वैतबद्दल भावना निर्माण होतील का, हा मोठा प्रश्न आहे. तसेच ती चांदेकर कुटुंबापर्यंत कशी पोहोचेल, हेही पाहणं रंजक ठरणार आहे.
ट्विस्ट जरी मोठा असला तरी प्रेक्षकांमध्ये असंतोष दिसून येतोय. काही जण तर ‘आता मालिका पाहणार नाही’ असंही म्हणत आहेत. या धक्कादायक बदलाचा मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होतो का हे पुढील काही आठवड्यांत समजेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
