Lakshmichya Pavalanni: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ आता शेवटाकडे जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन नवीन मालिका सुरू होणार असल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली. ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका रात्री ९.३० वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा अंतिम भाग प्रसारित होणार असल्याचं स्पष्ट झालं.
सध्या मालिकेत कलाचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. अपघातात तिचा अंत होतो आणि तिचं हृदय सुकन्याला देण्यात येतं. सुकन्या आधीपासून हृदयाच्या त्रासाने त्रस्त असते, त्यामुळे कलाचं हृदय तिच्या शरीरात बसवलं जातं. या नवीन आयुष्यात तिची ओळख अद्वैतशी होते. अद्वैत तिला घरी ठेवतो, कारण त्याला आजोबांची काळजी घ्यायला कुणीतरी हवं असतं. पण तिथं राहतानाच तिचं हृदय अद्वैतसाठी धडधडायला लागतं.
नव्या प्रोमोमध्ये मोठा ट्विस्ट दाखवला आहे. सुकन्याला तिच्या बॅगेत कलाने इस्पितळात लिहिलेली चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी ती अद्वैतकडे घेऊन जाते. त्यात कलाने लिहिलं असतं की, रोहिणी मॅडम आणि राहुल चांदेकर यांच्या संपूर्ण मालमत्तेवर डोळा ठेवून कट रचत आहेत, आणि तिचा खून करण्याचाही त्यांचा प्लॅन होता. हे वाचताच अद्वैत स्तब्ध होतो. सुकन्या त्याला खरी गोष्ट सांगते आणि दोघे मिळून या कटाला आळा घालण्याचं ठरवतात.
शेवटच्या भागात सुकन्या आणि अद्वैत राहुल आणि रोहिणीला धडा शिकवतात. तसेच अनामिकाचं रहस्य समोर येतं आणि सोहम-काजलचं लग्न दाखवलं जाणार आहे.
या मालिकेचा अंतिम भाग १२ डिसेंबरला प्रसारित होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
