नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट घेऊन येतोय ‘जब्राट’ हा मराठी चित्रपट. मैत्री, प्रेम, मजा आणि संगीताचा रंगीबेरंगी मेळ साधणारा हा सिनेमा प्रेक्षकांना धमाल अनुभव देणार आहे. तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आणि त्यावरूनच चित्रपटाची अतरंगी झलक पाहायला मिळाली.
‘जब्राट’ची स्टारकास्टही भन्नाट आहे. नवी पिढीतील आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात आणि श्रेया शंकर या तरुण कलाकारांसोबत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांचंही मजबूत पाठबळ मिळालं आहे. त्यामुळे तरुणाईसोबत अनुभवी कलाकारांचीही जोड या चित्रपटाला लाभली आहे.
निर्मितीची जबाबदारी अनिल अरोरा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण अनिकेत खंडागळे यांनी केलं असून नृत्यदिग्दर्शनाची धुरा ‘लावणी किंग’ आशिष पाटील यांच्या हाती आहे.
या चित्रपटाचं खरं आकर्षण म्हणजे त्याचं संगीत. डॉ. जयभीम शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि नंदेश उमाप यांसारख्या नामवंत गायकांनी गाणी गायलं आहेत. प्रेमगीतं, प्रेरणादायी गाणी आणि लोकगीतांचा तडका या चित्रपटात आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच मैत्री, प्रेम, म्युझिक आणि डान्सने भरलेली धमाल मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘जब्राट’ नावाप्रमाणेच सिनेमाही जबरदस्त ठरणार, यात शंका नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
