गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. मात्र, अजूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘सैराट’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘दशावतार’ हा विक्रम मोडतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट येतात. कमी बजेट असूनही काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. त्यात ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘पावनखिंड’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ अजूनही इतिहास रचणारा सिनेमा ठरतो. कॉलेजमधील प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाने तब्बल 110 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते.
‘बाईपण भारी देवा’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहा बहिणींच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने 90.5 कोटी रुपये कमावले.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ तिसऱ्या स्थानावर असून, त्याने 75 कोटी रुपये मिळवले.
इतिहासावर आधारित ‘पावनखिंड’ने 58 कोटींचा आकडा गाठला. तर नाना पाटेकर यांच्या अभिनयाने भारावलेल्या ‘नटसम्राट’ने 48 कोटी रुपये कमावले.
‘कट्यार काळजात घुसली’, ‘लय भारी’ आणि ‘टाईमपास 2’ हे चित्रपटही आपल्या काळात सर्वाधिक कमाई करणारे ठरले होते.
आता प्रश्न असा आहे की, ‘दशावतार’ची झेप किती उंच जाते आणि तो ‘सैराट’चा विक्रम मोडतो का?
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
