Khalid Ka Shivaji Marathi Movie: ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची माहिती आणि खोटेपणा पसरवल्याच्या आरोपांनंतर महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तक्रारींची दखल घेत हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, आता हा चित्रपट कान्समध्ये झळकणार नाही. ही माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
तात्काळ कारवाई आणि पुनर्तपासणी आदेश
मंत्री शेलार यांनी सांगितले की, चित्रपटामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याच्या आणि ऐतिहासिक विकृतीकरण झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर तात्काळ सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय, कान्स महोत्सवासाठी पाठवलेली चित्रपटाची शिफारसही मागे घेण्यात आली आहे.
कान्समध्ये गमावली संधी
महोत्सवात चित्रपट दाखवण्याची शिफारस करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC)ही निर्माते आणि दिग्दर्शकाला समन्स पाठवले असून, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. अधिकृत निवड यादीतून चित्रपट वगळण्यात आला असून, यासंदर्भात आयोजकांना ईमेलही पाठवण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी आणि निर्णय होईपर्यंत प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली होती. त्यांच्या पत्रात, ८ ऑगस्ट रोजी होणारे प्रदर्शन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकते, असा इशारा देण्यात आला होता.
थोडक्यात, ‘खालिद का शिवाजी’ वादामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या अडचणीत सापडला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
