आता जर्मनी पाहणार ‘दुसऱ्या जगातली’

Posted on Sep 8 2012 - 6:10am by Shailesh Narwade
Dusrya Jagatli

Dusrya Jagatli

रंग मराठी प्रतिनिधी, मुंबई.

भ्रूणहत्येवर आधारित ‘दुसऱ्या जगातली’ या सतीश रणदिवे दिग्दर्शित मराठी चित्रपटाची बर्लिन फिल्म फेस्टिवल साठी निवड करण्यात आली आहे. एका ज्वलंत सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चा आहे, आणि प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेल्या अनेक पुरस्कारांनी त्यात भर टाकली आहे. चित्रपटातली जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या महोत्सवात निर्मात्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या चित्रपटात शीर्षक भूमिकेसाठी वैष्णवी रणदिवे हिची कमालीची स्तुती होत आहे.