नाना पाटेकर साकारताहेत ‘डॉक्टर आमटे’

Posted on Sep 8 2012 - 6:14am by Shailesh Narwade

रंग मराठी प्रतिनिधी, मुंबई.

थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर एक मराठी चित्रपट तयार होत असून प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना शीर्षक भूमिका निभावण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसापूर्वी सावरकर सभागृह येथे आयोजित एका समारंभात, चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी हि घोषणा केली.

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा गावात मागील ४० वर्षांपासून रुग्णांची सेवा करण्यासाठी आमटे दाम्पत्याने केलेल्या संघर्ष आणि त्यागाची हि सत्यकथा आहे. या महान कार्यासाठी, भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांनी आमटे दाम्पत्याचा सत्कार केला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना जगप्रसिद्ध म्याग्सेसे पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण हेमलकसा गावात होणार असून छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांची आहे.